Syria Violence : सीरियात सुन्नी मुसलमानांकडून शिया मुसलमानांचा नरसंहार

१ सहस्रांहून अधिक शिया मुसलमानांची हत्या

दमास्कस (सीरिया) – गेल्या ३ दिवसांपासून सीरियामध्ये नरसंहार चालू आहे. यात आतापर्यंत १ सहस्रांहून अधिक शिया मुसलमानांचा मृत्यू झाला आहे. देशाचे नियंत्रण घेतलेले नवीन सरकार आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल्-असद यांच्या समर्थकांमधील हा संघर्ष भयानक बनला आहे. बहुतेक लोकांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या.  माजी राष्ट्राध्यक्ष असद यांच्याशी संबंधित सशस्त्र गटांमधील १४८ लोक मारले गेले आहेत. लताकिया शहराच्या आजूबाजूच्या मोठ्या भागात वीज आणि पिण्याचे पाणी यांची जोडणी खंडित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

१. डिसेंबर २०२४ मध्ये सीरियात सत्तांतर झाले. अबू महंमद अल्-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील एच्.टी.एस्. (हयात तहरीर-अल्-शाम) या सुन्नी मुसलमानांच्या संघटनेने राजधानी दमास्कस कह्यात घेतली आणि बशर अल्-असद यांना देश सोडून पळून जावे लागले.

२. सुन्नी मुसलमान असद यांच्या प्रदेशात अलावाइट अल्पसंख्यांकांविरुद्ध सतत मोहीम राबवत आहेत. अलावाइट अल्पसंख्यांक ही शिया मुसलमानांची एक शाखा आहे. बशर अल्-असद हे देखील अलावाइट समुदायातील आहेत. अलावाइट समुदायाने गेल्या अनेक दशकांपासून बशर अल्-असदच्या राजवटीला पाठिंबा दिला आहे.

३. अलावाइट समुदायाचे वर्चस्व असलेली गावे आणि शहरे यांमध्ये लोकांची हत्या करण्यात आली आहे. बंदूकधारी लोकांनी निवडकपणे पुरुषांची हत्या केली. लोकांना घराबाहेर ओढून गोळ्या घातल्या जात आहेत. रस्त्यावरून चालणार्‍या लोकांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. वेगवेगळ्या भागात अलावाइट घरे लुटली जात असून त्यांच्या घरांना आग लावण्यात येत असल्याने लोक घरे सोडून डोंगराळ भागात जात आहेत.

अनेक ठिकाणी लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माविषयी विचारण्यात आले. त्यांचे ओळखपत्र पडताळण्यात आले आणि त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. अलावाइट समुदायातील लोकांची घरे ओळखून ती जाळली जात आहेत.

संपादकीय भूमिका

मुसलमान जेथे अल्पसंख्य असतात, तेथे बहुसंख्यांकांना मारतात आणि जेव्हा देशात केवळ तेच असतात, तेव्हा एकमेकांना मारतात !  शांतता असणारा आणि सुखसमृद्धीने रहाणारा इस्लामी देश जगात दुर्मिळच असावा !