गावागावांतील विदेशी गोर्या लोकांच्या हकालपट्टीची मागणी

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे विधान !
नंदुरबार – जिल्ह्यातील काही भागांत झपाट्याने चर्चची संख्या वाढत असून आदिवासींचे वेगाने धर्मांतर केले जात असतांना माहिती अधिकारात निखालस खोटी उत्तरे देऊन खरी माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्या माध्यमातून मूळ आदिवासी संस्कृती, परंपरा आणि रूढी संपवण्याचे षड्यंत्र राबवले जात आहे; म्हणून आदिवासी भागांत धर्मांतर करणार्या व्यक्ती आणि संस्था यांची चौकशी व्हावी, तसेच वेगवेगळ्या गावांमध्ये वर्षानुवर्षे मुक्कामी थांबलेल्या विदेशी गोर्या लोकांचा शोध घेऊन त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी आदिवासी संस्कृती आणि रुढी परंपरा रक्षक उमेश गावीत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.
ते म्हणाले…
१. आदिवासींचे वेगाने ख्रिस्तीकरण होणे म्हणजे आदिवासी संस्कृतीवरील आक्रमण आहे. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. या भागांत धर्मांतराच्या षड्यंत्रात गुंतलेल्या सेवाभावी संस्थांचे गौडबंगाल काय आहे, याचा शोध घ्यायला हवा. या सर्व स्थितीकडे कानाडोळा करणार्या अधिकार्यांना नंदुरबारचे मणीपूर करायचे आहे का ?
२. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आम्ही ‘धर्मांतराच्या विरोधात कायदा महाराष्ट्रात कडक करावा, ११६ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अधिकृत/ अनधिकृत बांधलेल्या चर्चचा सर्व्हेक्षण करण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करावी, अनधिकृतरित्या बांधलेले चर्च पाडून टाकावे, अन्यथा आदिवासींची कुलदेवता श्री पांडूरीमातेच्या मूर्तीची स्थापना चर्चमध्ये करण्याचा कायदा पारित करावा’, या मागण्या करणार आहोत.
३. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार नवापूर तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींमध्ये एकही ख्रिस्ती व्यक्ती रहात नव्हती, अशी माहिती माहितीच्या अधिकारात देण्यात आली. नवापूर नगर परिषद हद्दीत अनेक चर्चची बांधकामे झालेली असतांना एकही चर्च अस्तित्वात नाही, अशी खोटी माहिती दिली आहे. जर एकही ख्रिस्ती नाही, तर मग इतके चर्च कोण उभारत आहे ? ही माहिती दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून का केला जात आहे ? आदिवासी संस्कृतीवर आघात करणार्यांना प्रशासन का पाठीशी घालत आहे ?
संपादकीय भूमिका :
|