
‘१८.१०.२०२४ या दिवशी पहाटे ५.४५ वाजता मला स्वप्नात दृश्य दिसले, ‘मी रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या जवळ होतो. ‘प.पू. डॉक्टरांना पलंगावरून उठवण्यासाठी साहाय्य हवे होते’, यासाठी त्यांच्या सेवेतील एक साधक मला बोलवायला आला.
मी त्या साधकाच्या समवेत खोलीत गेलो. तेव्हा प.पू. डॉक्टर पलंगावर झोपले होते. आम्ही दोघांनी त्यांना उठवून बसवले. तेव्हा त्यांना पुष्कळ थकवा होता. त्यांना ‘उलटी होणार’, असे आम्हाला वाटत होते. मी आजूबाजूला ‘उलटी धरण्यासाठी लागणारे एखादे भांडे दिसते आहे का ?’, ते पाहू लागलो; पण मला भांडे दिसले नाही. तेवढ्यात ‘प.पू. डॉक्टरांना उलटी होत आहे’, असे मला वाटले. मी लगेच माझ्या दोन्ही हातांची ओंजळ करून उलटी माझ्या हातात धरली. नंतर मी त्यांचे तोंड मोठ्या हातरुमालाने पुसले.’ त्यानंतर मला जाग आली. ‘स्वप्नातही माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा करून घेतली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |