‘अनुमाने १० वर्षांपूर्वी रामनाथी (गोवा) येथे मी ‘राष्ट्रीय हिंदु अधिवेशना’ला गेलो होतो. तेव्हा मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.


१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचे भाषण चालू झाल्यावर माझे संपूर्ण शरीर रोमांचित होऊन क्षात्रतेजाने भारीत झाले.
२. प्रल्हादाच्या हाकेसरशी येणारा भगवान श्री नृसिंह मला दिसला. तेव्हा मला हलके वाटले. त्या रौद्ररूपाच्या चरणांवर मी मनोमन मस्तक ठेवले.
३. सद्गुरु पिंगळेकाका यांचे भाषण ऐकतांना मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या ‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा ।’ या वचनाची आठवण झाली. ‘त्यांच्याच रूपात सद्गुरु पिंगळेकाका मार्गदर्शन करत आहेत’, असे मला वाटले.’
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, फोंडा, गोवा. (१३.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |