‘साधिकेला पूर्णवेळ साधना करता यावी’, यासाठी कुटुंबाचे दायित्व घेणारे जावई आणि मुलगी : श्री. शैलेश अरुण केत अन् सौ. कीर्ती शैलेश केत !

‘९.३.२०२५ या दिवशी सोलापूर येथील माझी मुलगी सौ. कीर्ती शैलेश केत आणि जावई श्री. शैलेश अरुण केत यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. शैलेश केत
सौ. कीर्ती केत

श्री. शैलेश अरुण केत आणि सौ. कीर्ती शैलेश केत यांना विवाहाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !

श्रीमती भारती गलांडे

१. अनेक अडचणी येऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लग्न आनंदात पार पडणे

माझी मुलगी सौ. कीर्ती शैलेश केत हिचे लग्न वर्ष २००० मध्ये झाले. त्या वेळी तिच्या लग्नात अनेक अडचणी आणि संकटे आली; पण केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने तिचे लग्न चैतन्याच्या स्तरावर आणि आनंदात पार पडले. तिच्या लग्नाला सनातनचे साधक आले होते, तसेच त्यांनी सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावले होते.

२. परिस्थिती स्वीकारणे

मुलीच्या सासरचे कुटुंब मोठे आहे. त्या सर्वांनी मला सांभाळून घेतले. मी कीर्तीच्या दोन्ही मुलांच्या बाळंतपणाच्या वेळी काही कारणास्तव जाऊ शकले नाही. ती परिस्थिती मुलगी आणि जावई यांनी आनंदाने स्वीकारली.

३. मुलीच्या पोटी दैवी बालिका जन्माला येणे

गुरुकृपेने कीर्तीच्या पोटी दैवी बालिकेने (कु. अक्षता शैलेश केत, आताचे वय २३ वर्षे) हिने)) जन्म घेतला आहे. ती जन्मापासून शांत आणि गुणी आहे. इतर मुलांप्रमाणे तिच्याकडे कधीच लक्ष द्यावे लागले नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कु. अक्षताचे लहानपणी कौतुक केले होते.

४. कठीण कौटुंबिक प्रसंगांत स्थिरतेने दायित्व पार पाडणे

कीर्तीने अनेक कठीण कौटुंबिक प्रसंगांत स्थिरतेने आणि प्रेमाने दायित्व पार पाडले. तिने माहेर आणि सासर दोन्हीकडील दायित्वे कुशलतेने सांभाळली. ती एका खासगी आस्थापनात व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून नोकरी करते. ती आम्हा कुटुंबियांचा आधार बनली आहे.

५. मुलगी आणि जावई यांनी साधिकेला साधनेत केलेले साहाय्य !

५ अ. मुलीने दायित्व घेऊन दोन्ही भावंडांना सांभाळल्याने साधिकेला आश्रमात येऊन पूर्णवेळ साधना करता येणे : वर्ष २००१ मध्ये मी माझी मुलगी (कै. (सौ.) स्मृति रेवण बेरूणगीकरे (त्या वेळचे वय १५ वर्षे) आणि मुलगा (कु. सुमित गलांडे, त्या वेळचे वय १० वर्षे)) यांना कीर्तीकडे सांभाळण्यासाठी ठेवले होते. त्यामुळे मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनेसाठी येता आले. पुढे कीर्ती आणि तिचे पती यांनी माझ्या दोन्ही मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, मुलीचा विवाह, तिचा अंत्यविधी इत्यादी सर्वकाही केले. यांविषयी दोघांनी कधीही गार्‍हाणे केले नाही किंवा पैशाविषयी विचारले नाही.

५ आ. कुटुंबियांचे धार्मिक विधी करण्यासाठी साहाय्य करणे : मुलगी आणि जावई यांनी माझा ‘उग्ररथ शांतीविधी’, माझ्या आईचा (कै. (सौ.) सुलोचना नेताजी जाधव (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचा)) ‘ऐंद्री शांतीविधी’ अन् माझ्या वडिलांचा (श्री. नेताजी जाधव, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८५ वर्षे) यांचा)) ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी’ करण्यासाठी पुष्कळ साहाय्य केले.

(वयाप्रमाणे करण्यात येणारे विविध शांतीविधी : ‘व्यक्तीने वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर तिची इंद्रिये हळूहळू दुर्बल होऊ लागतात. त्यांना बल प्राप्त व्हावे; म्हणून वयाच्या ५० व्या वर्षापासून प्रत्येक ५ वर्षांनी शांतीविधी केला जातो. व्यक्तीने ६० व्या वर्षात पदार्पण केल्यावर ‘उग्ररथ शांतीविधी’, ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यावर ‘ऐंद्री शांतीविधी’ आणि ८० व्या वर्षात पदार्पण केल्यावर ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी’ केला जातो.’ – संकलक)

‘हे गुरुदेवा, ‘मला मुलगी, जावई आणि मुलीच्या सासरची माणसे यांच्याकडून साधना करण्यास साहाय्य मिळत आहे’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती भारती गलांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२४)