मुलीकडून विधवा आईची अडीच कोटींची फसवणूक !

पिंपरी (पुणे) – विधवा आईचे देहलीतील घर विकून आधुनिक वैद्य असलेली मुलगी आणि जावई यांनी विविध कारणे सांगत तिच्याकडून २ कोटी ५८ लाख ८२ सहस्र रुपये घेत तिची आर्थिक फसवणूक केली. पिंपळे सौदागर येथे १ जानेवारी २०१२ ते १ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी पिंपळे सौदागर येथील ८१ वर्षीय वृद्ध महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलगी आणि जावई यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचरण न करणारी पिढी आज विधवा आईचीही फसवणूक करण्यास मागे-पुढे पहात नाही. – संपादक) आईने मुलीच्या वडिलांचे पासबुक, चेक बुक (धनादेश पुस्तक), पॅनकार्ड आणि अन्य कागदपत्रे मागितली असता मुलीने आईला मारहाण केली. बनावट स्वाक्षरी करून आई-वडिलांच्या संपत्तीची अवैधरित्या विक्री करून फसवणूक केली.