सोलापूर – येथील मंगळवेढ्याच्या सिद्धनकेरी मठाच्या धर्माेपदेशकाला स्थानिक गावगुंडानी सळईने मारहाण केली. या मारहाणीत राचोटेश्वर शिवाचार्य स्वामी हे गंभीर घायाळ झाले असून मारहाण केल्याच्या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘या मठाचा पुजारी आणि मालक मीच आहे, तुझा येथे काही संबंध नाही’, असे मारहाण करणारे गावगुंड बोलत होते. स्वामीजींना त्यांच्या मठातच ही मारहाण करण्यात आली आहे.