नाना पेठ (पुणे) येथे साडेअकरा लाखांचे मॅफेड्रोन जप्त !

गुन्हे शाखेकडून २ आरोपींना अटक !

पुणे – मॅफेड्रोन विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या अदीब शेख आणि यासीर सय्यद यांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने नाना पेठेत अटक केली. (लोकसंख्येत अल्प असलेले गुन्हेगारीत बहुसंख्य धर्मांध ! – संपादक) त्यांच्याकडून

११ लाख ४० सहस्र रुपयांचे ५७ ग्रॅम मॅफेड्रोन जप्त करण्यात आले. आरोपी मॅफेड्रोनची विक्री करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. आरोपींकडून मॅफेड्रोनसह १३ लाख ४२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.