मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार ! 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई – मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करून या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. आमदार अमिन पटेल यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.