दुचाकीच्या अपघाताच्या  वेळी साधिकेचे गुरुकृपेने रक्षण होणे

सौ. प्रीती कुलकर्णी

‘१०.१२.२०२४ या दिवशी सायंकाळी ७.४५ वा. मी पुणे येथील सेवाकेंद्रातून दुचाकीने माझ्या घरी जात होते. काही अंतरावर गेल्यानंतर माझ्या दुचाकीचा अपघात झाला. माझ्या दुचाकीच्या पुढील बाजूच्या चाकाचे दोन्ही ‘शॉक ॲब्झॉर्बर’ (गाडीला लागणारे झटके नियंत्रित करणारा भाग) तुटून गाडीच्या पुढे उडून पडले. त्यामुळे गाडीचा पुढचा भाग थोडा वर उचलला गेला. तेव्हा ‘नेमके काय झाले आहे ?’, हे माझ्या लक्षातच आले नाही. त्या स्थितीतही मी गाडीवर शांतपणे बसून होते. आजूबाजूच्या लोकांनी येऊन माझी गाडी रस्त्यावरून बाजूला घेतली. दोन-तीन लोक मला म्हणालेही, ‘‘तुमच्यावर खरंच कृपा आहे, नाहीतर अशा अपघातात तुम्हीही समोर तोंडावर पडला असता.’’ हे ऐकल्यावर, ‘केवळ गुरुदेवांचे अभेद्य संरक्षककवच माझ्याभोवती असल्यानेच मला काही झाले नाही’, हे माझ्या लक्षात आले आणि गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. या प्रसंगातून मला पुन्हा एकदा, ‘गुरुदेव नेहमी माझ्या समवेत आहेत आणि क्षणोक्षणी ते माझी काळजी घेत आहेत. त्यांच्याच कृपेने माझा श्वासही चालू आहे’, याची जाणीव झाली. मी गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’

– सौ. प्रीती कुलकर्णी, पुणे (४.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक