Mumbai Minor GangRape : मुंबईत शाळकरी मुलीवर बलात्कार करणार्‍या ५ अल्पवयीन धर्मांधांना अटक !

जोगेश्वरी (मुंबई) – घरातून रागावून निघालेल्या १२ वर्षीय शाळकरी मुलीस जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर एकटे पाहून वातानुकूलित यंत्र दुरुस्त करणारे जमाल, आफताब, महफुज, हसन आणि जाफर यांनी आमीष दाखवले. मरीन ड्राईव्हला फिरवून शेवटी घरी आणले अन् तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दुसर्‍या दिवशी सकाळी सर्व संशयित आरोपी कामावर गेले, तेव्हा मुलीने तेथून पळ काढला. रस्त्यावर फिरणार्‍या मुलीला पाहून संशय आल्याने दादर पोलिसांनी तिची चौकशी केली, तेव्हा पीडितेने हा प्रकार सांगितले. त्यानंतर ५ धर्मांधांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

धर्मांध आरोपींच्या पालकांकडून त्यांची पाठराखण !

या प्रकरणात संशयित आरोपींचे पालक ‘आमची मुले असे करू शकत नाहीत, तसेच आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना किमानच शिक्षा करा’, असे सांगत आहेत. (अनेक बलात्कार प्रकरणांमध्ये आरोपी अल्पवयीन असतात; म्हणून त्यांना मोकळीक न देता कठोर शिक्षा होण्यासाठी तशा स्वरूपाचा कायदा होणे आवश्यक आहे ! असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, अशीच शिक्षा धर्मांधांना द्यायला हवी ! – संपादक)

आरोपींना पाठीशी घालणारी प्रसिद्धीमाध्यमे !

या प्रकरणाचे वृत्त देतांना बर्‍याचशा प्रसिद्धीमाध्यमांनी बातमीत संशयित धर्मांधांची नावे प्रसिद्ध केलेली नाहीत. (अशी पत्रकारिता काय कामाची ? – संपादक)

संपादकीय भूमिका

अशांना शरियतप्रमाणे खड्ड्यात कमरेएवढे पुरून दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !