DMK’s Thieve Corporator : तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या नगरसेवकाकडून आंदोलनाच्या वेळी महिला नेत्याच्या हातातील सोन्याची बांगडी काढण्याचा प्रयत्न

व्हिडिओ प्रसारित झाल्यावर नगरसेवक झाकीर हुसेन यांच्यावर होत आहे टीका

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

द्रमुकचे नगरसेवक झाकीर हुसेन (उजवीकडे) एका महिला नेत्याच्या हातातून सोन्याची बांगडी काढण्याचा प्रयत्न करताना

चेन्नई (तमिळनाडू) – द्रमुकचे नगरसेवक झाकीर हुसेन यांनी हिंदी भाषेविरुद्धच्या आंदोलनात शपथ घेतांना शेजारी उभ्या असलेल्या एका महिला नेत्याच्या हातातून सोन्याची बांगडी काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. द्रमुककडून अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, सर्व नेते एक हात समोर ठेवून शपथ घेत आहेत. तेव्हा झाकीर हुसेन शेजारी उभ्या असणार्‍या महिलेच्या हाताला वारंवार स्पर्श करत आहेत. ते त्या महिलेच्या हातातून बांगडी काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा शेजारी उभी असलेली दुसरी महिला झाकीरच्या हातावर मारते आणि त्यांना दूर ढकलते; पण झाकीर हुसेन पुन:पुन्हा बांगडी काढण्याचा प्रयत्न करतात.

चोरी आणि द्रमुक कधीही वेगळे करता येणार नाहीत ! – भाजप

तमिळनाडूतील भाजपचे अध्‍यक्ष के. अण्‍णामलाई

भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनीही संबंधित व्हिडिओ शेअर करून लिहिले की, वॉर्ड क्र. २५, कुन्नूर येथील द्रमुकचे नगरसेवक ज्याने हिंदी विरोधी निषेधाच्या बहाण्याने बांगडी चोरली. चोरी आणि द्रमुक कधीही वेगळे करता येणार नाहीत.

(Mr. Zakir Hussain, DMK councilor of Ward 25 of Coonoor Municipal Council, steals bangles under the guise of anti-Hindi. Thirutta and DMK can never be separated!)

संपादकीय भूमिका

  • दिवसाढवळ्या सर्वांसमोर अशा प्रकारचे कृत्य करण्याची कोणतीही लाज न बाळगणार्‍यांना लोक निवडून कसे देतात ? द्रमुक अशांना पक्षातून हाकलून देण्यासह त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबणार का ?
  • देशातील अल्पसंख्यांक मुसलमान नेहमीच गुन्हेगारीत बहुसंख्य असल्याचे का दिसतात ?, याचे उत्तर एकही निधर्मीवादी कधीही देणार नाही !