देवा, कृतज्ञ आहोत आम्ही आपल्या चरणी ।

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

अखंड प्रीतीचा वर्षाव ।
साधकांवर करता तुम्ही ।। १ ।।

सौ. अंजली झरकर

आध्यात्मिक त्रासांविरुद्ध ।
लढण्यास बळ देता तुम्ही ।। २ ।।

विचारांना योग्य दिशा ।
देणारेही आपणच आहात ।। ३ ।।

साधकांच्या चेहर्‍यावरील आनंदाने ।
आनंदी होणारे आपणच आहात ।। ४ ।।

साधकांना सुख-दुःखाच्या पलीकडे ।
घेऊन जाण्यास प्रयत्न करता ।। ५ ।।

आम्ही अल्प पडत असतांनाही ।
आमच्यावर कृपाच करता ।। ६ ।।

देवा, कृतज्ञ आहोत आम्ही आपल्या चरणी ।

मनमोहक रूप असणार्‍या, मधुर हास्य असणार्‍या आमच्या सद्गुरु राजेंद्रदादांना (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना) भावपूर्ण नमस्कार !

– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.९.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक