(म्हणे) ‘अटकेतील फुटीरतावाद्यांशीही चर्चा होऊ शकते !’ – जम्मू-काश्मीरचे भाजपचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

देशद्रोही कारवाया करणार्‍यांना आधी कारागृहात डांबायचे आणि आता त्यांच्याशी चर्चा करण्याचे घोषित करायचे, याला काय म्हणायचे ?

काश्मीरची समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेले केंद्र सरकार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

जम्मू-काश्मीरचे भाजपचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

श्रीनगर – जिहादी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्यावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्आयएकडून) अटक करण्यात आलेल्या फुटीरतावाद्यांशीही चर्चा करता येऊ शकते; कारण असे सर्वत्र होत असते, असे विधान जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते निर्मल सिंह यांनी केले. चर्चा आणि एनआयएची चौकशी यांकडे एकाच अंगाने पाहू नये, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.


Multi Language |Offline reading | PDF