
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी स्वयंसूचनांच्या सुलभ पद्धती सांगून त्यांचे लिखाण करण्यास शिकवणे
‘प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या प्रारब्धानुरूप अल्प-अधिक जन्म झालेले असतात. त्या प्रत्येक जन्मात निर्माण होणारे स्वभावदोषांचे ओझे व्यक्तीला चालू जन्मात भोगावे लागते. त्यामुळे तिचे जीवन दुःख, ताण आणि अशांतता यांमध्येच व्यतीत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी ‘प्रतिदिन साधकांकडून होणार्या चुका आणि त्यावर योग्य दृष्टीकोन लिहिणे अन् मनाला स्वयंसूचना देणे’, या सुलभ पद्धती शिकवल्या. त्यामुळे साधकांच्या मनावर योग्य विचार आणि कृती करण्याचा संस्कार होऊ लागला. त्यामुळे साधकांचे जीवन हळूहळू आनंदी होण्यास साहाय्य झाले.

२. साधकाचा एकेक स्वभावदोष दूर होऊ लागल्यावर त्याच्या मनाला हलकेपणा आणि आनंद जाणवू लागणे
एखाद्या धाग्याचा गुंता एकाच वेळी सुटत नाही. त्यासाठी धाग्यातील एकेक गुंता सोडवावा लागतो. शेवटी धाग्यातील गुंता सुटला की, आपल्याला आनंद होतो. तसेच साधकाचा एकेक स्वभावदोष दूर होऊ लागल्यावर त्याच्या मनाला हलकेपणा आणि आनंद जाणवू लागतो.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना अनेक जन्मांतील स्वभावदोषांचा गुंता सहजतेने सोडवण्याचे दुर्मिळ ज्ञान देऊन साधकांचे जीवन आनंदी केले’, याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२५)