
मुंबई – जागतिक एआयचा प्रवास भारताविना अपूर्ण आहे, असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी १ मार्च या दिवशी व्यक्त केले. ‘मुंबई टेक वीक २०२५’ मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भारतासाठी एआय हे दीर्घकालीन धोरण असून ते आंतरराष्ट्रीय व्यापार कराराचा महत्त्वाचा भाग आहे. एआय हे परिवर्तनकारी तंत्रज्ञान असले, तरीही मानवी बुद्धीमत्ता नेहमीच त्यापेक्षा वरचढ राहील. चुकीच्या माहितीवर प्रक्रिया केल्यास एआय चुकीचे निष्कर्ष काढू शकतो. त्यामुळे मानवी देखरेख आवश्यक आहे. भारतातील ४३ टक्के विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित यांच्या पदवीधर महिला एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत.’’