
केंब्रिज (अमेरिका) – जगातील सर्वांत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था ‘हार्वर्ड विद्यापीठ’चा दुहेरी चेहरा समोर आला आहे. स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक म्हणवणार्या या संस्थेने ‘खलिस्तानी आंतकवाद आणि त्याचा भारत-कॅनडा संबंधांवर होणारा परिणाम’ या विषयावर लिहिलेला लेख खलिस्तान्यांच्या दबावाखाली येऊन काढून टाकला. हा लेख काढल्यावरून विद्यापिठावर टीका होत आहे.
१. खलिस्तानशी संबंधित हा लेख विद्यापिठाच्या ‘हार्वर्ड इंटरनॅशनल रिव्ह्यू’मध्ये प्रकाशित झाला होता. तो झिना ढिल्लन नावाच्या विद्यार्थिनीने लिहिला होता. ‘अ थॉर्न इन द मेपल : हाऊ द खलिस्तान क्वेश्चन इज रिशेपिंग इंडिया-कॅनडा रिलेशन्स’ असे या लेखाचे शीर्षक होते. हा लेख १५ फेब्रुवारी २०२५ या दिवशी तो प्रकाशित झाला होता. या लेखात भारतातील वाढत्या खलिस्तानी आतंकवादाविषयी, कॅनडामध्ये त्याच्या वाढीविषयी आणि भारत-कॅनडा संबंधांवर त्याचा कसा परिणाम होत आहे ?, यांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली होती. हा लेख २२ फेब्रुवारी २०२५ या दिवशी काढून टाकण्यात आला.
२. ‘हार्वर्ड इंटरनॅशनल रिव्ह्यू’ हे हार्वर्ड विद्यापिठातील ‘हार्वर्ड इंटरनॅशनल रिलेशन्स कौन्सिल’द्वारे प्रकाशित होणारे त्रैमासिक आहे. या लेखाच्या लेखिका झीना ढिल्लन या हार्वर्डच्या विद्यार्थिनी आहेत. वादानंतर त्यांचे चरित्र अचानक हार्वर्ड इंटरनॅशनल रिव्ह्यूच्या संकेतस्थळावरून गायब झाले.
३. या प्रकरणी झीना ढिल्लन यांनी म्हटले की, मला वाटले की, हार्वर्ड इंटरनॅशनल रिव्ह्यू दबावाखाली आहे. माझ्या मते हा घाईघाईने घेतलेला निर्णय होता.
संपादकीय भूमिकाखलिस्तान आतंकवाद अमेरिका आणि कॅनडा पुरस्कृत आहे, असेच चित्र आहे. त्यामुळे खलिस्तानविरोधातील लेख अमेरिकेला कसा चालणार ? |