रत्नागिरी – भारतीय ज्ञानपरंपरा ही जगातील सर्वांत प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे. या प्रणालीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, भाषा, कला, संगीत, आयुर्वेद, धर्म, तत्त्वज्ञान, स्थापत्यशास्त्र, नीतीशास्त्र, प्रशासन, शेती, पर्यावरण आणि विविध ज्ञानशाखा यांचा समावेश आहे. भारतीय ज्ञान प्रणालीचे पुनरुज्जीवन केल्यास आधुनिक समस्यांच्या निवारणासाठी उपयोग होऊ शकतो. या भारतीय ज्ञानपरंपरेचे योगदान आणि आधुनिक काळात असणारे महत्त्व नव्या पिढीला समजावे, तसेच आधुनिक विचारांचा समन्वय साधून एक नवीन दृष्टी प्राप्त व्हावी, उद्देशाने रत्नागिरी येथे ६ ते ८ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृत विभाग अन् गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी बसस्थानकासमोरील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, तिसरा मजला येथे ही कार्यशाळा होणार आहे.
ही कार्यशाळा निःशुल्क असून https://forms.gle/9VBtyhi2X5ehTwos8 या लिंकवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
कार्यशाळेत सहभागी होणार्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या कालावधीत ३ दिवस दुपारच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांद्वारे करण्यात येणार आहे. ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ विषयाचे जिज्ञासू, सर्व शाखेचे विद्यार्थी संशोधक, शिक्षक आणि प्राध्यापक यांनी कार्यशाळेत सहभागी होऊन भारतीय ज्ञानपरंपरा समजून घ्यावी.
अधिक माहितीसाठी अविनाश चव्हाण (८३९०८५४९२६) आणि कु. काश्मिरा दळी (९०२८४९४१९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.