परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग चालू असतांना खोलीत सूक्ष्म गंध येण्‍याच्‍या संदर्भात प्रयोग केल्‍यावर संत आणि साधिका यांना जाणवलेली सूत्रे

एकदा काही साधकांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. तेव्‍हा ‘सत्‍संग चालू असलेल्‍या खोलीत सूक्ष्म गंध येतो का ?’, या संदर्भात साधकांकडून प्रयोग करून घेण्‍यात आला. या प्रयोगाच्या वेळी संत आणि साधिका यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत)

पू. संदीप आळशी

अ. ‘सत्‍संग चालू झाल्‍यावर काही वेळाने मला फुलाचा सुगंध आला.

आ. प्रयोग करायला सांगितल्‍यावर मला धूपबत्ती लावल्‍यावर जसा गंध येतो, तसा सुगंध आला.’

२. सौ. अवनी संदीप आळशी

१. ‘प्रयोग करायला सांगितल्‍यावर मला प्रत्‍येक श्‍वासागणिक वेगवेगळा सुगंध आला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २३.१.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक