
उरण – उरण द्रोणागिरी नोड येथे गामी ग्रुप या विकासकाच्या वतीने करण्यात येणार्या बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदाराने बांगलादेशी कामगार कामावर ठेवले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांची पडताळणी केली. यात ७ बांगलादेशी पुरुष आढळून आले. त्यांना कह्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली.
संपादकीय भूमिका :राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुके येथे बांगलादेशींनी केलेली घुसखोरी चिंताजनक ! |