महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांत ‘छावा’ला अभूतपूर्व प्रतिसाद !

कोल्हापूर, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट उलगडून दाखवणार्‍या ‘छावा’ चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. तेलंगाणा, देहली या राज्यांतील खेळही ‘हाऊसफुल्ल’ आहेत. कोल्हापूर येथे ढोल-ताशांच्या गजरात आणि मैदानी खेळ दाखवून ‘छावा’चे स्वागत करण्यात आले. ‘छावा’ला विशेषकरून तरुण पिढीचा ओढा मोठ्या प्रमाणात असून अनेकांनी ‘हा चित्रपट परत परत पहाणार आहे’, असे सांगितले.