प्रयागराज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभपर्वामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केले. या वेळी माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त करतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाकुंभ हा आम्हा सर्वांसाठी मोठे पर्व आहे. १४४ वर्षांनी महाकुंभपर्वाचा दुर्लभ संयोग आहे. येथे येऊन गंगेमध्ये पुण्य स्नान करण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मी ही याच भावनेने येथे आलो आहे. ज्या प्रकारे योगी शासनाने महाकुंभपर्वाचे आयोजन केले आहे, हे सर्व जगाला लक्षात रहाण्यासारखे आहे.’’