पुराणांचे महत्त्व

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘भारत देश हा शक्तीशाली आणि एकात्म बनवण्याकरता पुराणांचा प्रचार अटळ होता. पुराणे तर भारताचा प्राण आहेत. त्याकरता अनेक विद्यापतींनी गेली ४० वर्षे पुराण चिंतनात घालवली. त्यांनी ‘विष्णु पुराणां’ची सूची केली होती. त्यांचे १० खंड सिद्ध केले.

१. सर्ग-प्रतिसर्ग

२. तीर्थ, भूगोल आणि भुवनकोश

३. शास्त्रे, विद्या आणि कला

४. दार्शनिक संप्रदाय आणि प्रमेये

५. आचार, कर्मकांड

६. कलियुग, मन्वंतर, कल्प

७. संवाद, स्तुती, स्तोत्रे, नीती, गीता उपदेशादि

८. वंश आणि वंशानुचरित

९. जाती आणि व्यक्तींची चरित्रे अन् आख्याने

१०. निर्वचन लक्षण, गणना वर्णादि.

दक्षिण भारताच्या प्रवेशद्वाराच्या फळ्यावरचा पुराणासंबंधीचे लिखाण असे होते, ‘भूतकाळाने भारताला दिलेला पुराणांचा शाश्वत स्वरूपाचा वारसा सर्वाधिक मोलाचा आहे. भारत हा सामर्थ्यशाली आणि एकात्म देश बनवण्याकरता पुराणे घराघरांत, झोपडी झोपडींत पोचली पाहिजेत.’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०२४)