Dholpur Cow Smugglers Attack : राजस्थानमध्ये गोतस्करांचा गोरक्षकांवर गोळीबार !

राजस्थानमधील गोरक्षक

धोलपूर (राजस्थान) – राजस्थानमधील धोलपूरमध्ये गोतस्करांनी गोरक्षकांच्या गटावर गोळीबार केला. हे गोतस्कर एका कंटेनरमध्ये गायींना कोंबून धोलपूरहून उत्तरप्रदेशात घेऊन जात होते. गोरक्षक येथे पोचताच गोतस्करांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक गोरक्षक घायाळ झाला. गोतस्करांनी घटनास्थळावरून गायींनी भरलेल्या वाहनासह पळ काढला. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली आणि ३ गोतस्करांना अटक केली. पोलिसांनी गोतस्करांचे वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना गोरक्षक सुरक्षित आणि गोतस्कर कारागृहात असणे हिंदूंना अपेक्षित आहे !