प्राप्तीकर विभागाच्या कारवाईत वेळेत प्राप्तीकर न भरणारे महापालिकेचे कर्मचारी दोषी आढळले !

पुणे – महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी टी.डी.एस्. (करदात्याकडून वजा केलेली कराची रक्कम जी आयकर विभागाकडे भरली जाते), आधारकार्ड, पॅनकार्ड जोडणी न केल्याने प्राप्तीकर विभागाने त्यांच्याकडून दंडवसूली चालू केली आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना प्राप्तीकर लागू झाला होता. ही रक्कम ४० ते ५० लाख रुपये आहे. ही रक्कम २ टप्प्यांत वसूल केली जाणार आहे. त्यामुळे काही कर्मचार्‍यांना २ महिने वेतन मिळणार नाही.

या संदर्भात ‘पी.एम्.पी. एम्प्लॉईज युनियन’चे अध्यक्ष बजरंग पोखरकर, उपाध्यक्ष विशाल ठोंबरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी आयुक्त पृथ्वीराज बी.जी. यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली. महापालिकेने नेमलेला सल्लागार, लेखा व वित्त विभाग यांसाठी उत्तरदायी असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.