
‘मनुष्याच्या जीवनात जन्मापासून वयोवृद्ध होईपर्यंत विविध प्रकारच्या समस्या असतात, उदा. लहान मुलांच्या वाईट सवयी ते वयोवृद्धांची बिघडलेली मानसिक स्थिती. अशा या समस्यांवर अनेक नियतकालिके, प्रसारमाध्यमे, ग्रंथ आदीतून लिखाण केले जाते. त्यांवर मानसिक स्तरावरील संभाव्य उपाययोजना सांगितली जाते; पण येथे कुणीही लक्षात घेत नाही की, या सर्व समस्यांचे मूळ ‘प्रारब्ध’ आहे. या प्रारब्धावर केवळ साधनेने मात करू शकतो. एखाद्या व्यक्तीने गेल्या जन्मी साधना केलेली नसते, त्यामुळे त्याला बालपणी आणि तरुणपणीही आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लागते आणि जगत असलेल्या आयुष्यात कधीही साधना केलेली नसल्यामुळे म्हातारपणी अडचणींना सामोरे जावे लागते. तेच जर का साधनारत राहिले असते, तर त्यांना प्रारब्धावर मात करून आनंदी जीवन जगता आले असते. हा मूलभूत सिद्धांत कुणीच शिकवत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले