मुंबईसह नागपूर येथेसुद्धा ‘ताज’ हॉटेल चालू करण्यात यावे ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई – ताज हे केवळ हॉटेल नसून प्रत्येक भारतियाचा अभिमान आहे. मुंबईसह नागपूर येथेसुद्धा ‘ताज’ हॉटेल चालू करण्यात यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वांद्रे परिसरात ‘ताज बँडस्टँड’ या नव्या हॉटेलचे भूमीपूजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. ताज हॉटेल मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे असून पर्यटन तसेच व्यावसायिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे ठरणार आहे. हे हॉटेल भविष्यात मुंबईची नवी ओळख निर्माण करील. मुंबईत आणखी नव्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असलेल्या हॉटेल्सची आवश्यकता आहे. यासाठी या क्षेत्रातील आस्थापनांनी नव्या प्रकल्पांची उभारणी करावी.’’