
१. नामजप केल्यामुळे एका रुग्णाईत साधकाला बरे वाटू लागणे
‘एका रुग्णाईत साधकासाठी मला जप करायला सांगितला होता. ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने मागील १० मासांपासून मी त्या साधकासाठी नामजप करत आहे. आतापर्यंत गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून १० लक्ष, ३७ सहस्र, ३४० इतका नामजप झाला. माझ्याकडून जप झाल्यावर त्या साधकाला बरे वाटू लागले.
२. नामजप केल्यामुळे आंब्यांना लागत असलेली कीड न्यून होणे
तपोधाम (रत्नागिरी) येथील आंबे कीड लागून खराब होत होते. त्यासाठी मला सांगितलेला जप केल्यावर या वर्षी आंब्यांना कीड लागली नाही.
३. समवेत कोणीही नसतांना रेल्वेस्थानकावर धक्का लागून खाली पडल्यावर एका तरुणीच्या माध्यमातून गुरुदेवांनीच घरी जाईपर्यंत साहाय्य केल्याची जाणीव होणे
वर्ष २०२३ च्या दीपावलीच्या कालावधीत पनवेलला जाण्यासाठी कुर्ला स्थानकावरून रेल्वेमध्ये चढत असतांना एका माणसाच्या धक्क्याने मी खाली पडलो. मला स्वतःला उठता येईना; पण देवाच्या कृपेने एका मुलीने मला उठायला साहाय्य केले आणि पनवेलला जाणार्या रेल्वेत बसवले. पनवेलला उतरल्यावर त्याच मुलीने मला देवद येथील माझ्या घरी जाण्यासाठी रिक्शात बसवून दिले. रिक्षाचालकाने मला घरासमोर आणून सोडले. ‘हे गुरुदेवा, त्या तरुणीच्या आणि रिक्षावाल्याच्या माध्यमातून तुम्हीच मला साहाय्य केले’, याची मला जाणीव झाली.
आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. हनुमंत शिंदे (हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे वडील) (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८२ वर्षे), फोंडा, गोवा. (३०.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |