आज माघ पौर्णिमा आहे. त्या निमित्ताने…
‘एका मान्यतेनुसार पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान यांच्यासाठी माघ मास विशेष महत्त्वाचा असतो. अशा वेळी जेथे गंगा-यमुना आणि गुप्त सरस्वती यांचा संगम होतो त्या तीर्थराज प्रयागाचे महत्त्व काय वर्णावे ! येथे तर संपूर्ण माघ मासात निवास करून स्नानाचे माहात्म्य सांगण्यात आले आहे. यालाच ‘कल्पवास’ असे म्हटले जाते. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात म्हटले आहे,
‘प्रयागे माघपर्यन्तं त्रिवेणी सङ्गमे शुभे ।
निवासः पुण्यशीलानां कल्पवासो हि कथ्यते ॥
अर्थ : माघ मासापर्यंत प्रयागक्षेत्री असणार्या शुभ अशा त्रिवेणी संगमावर निवास, म्हणजे पुण्यवंतांसाठी ‘कल्पवास’ असे म्हटले जाते.’
१. माघी पौर्णिमेचे महत्त्व
अशा मासाची प्रत्येकच तिथी पुण्यदायी होते. नंतरसुद्धा माघ मास पूर्ण होईपर्यंत, म्हणजे माघी पौर्णिमेचा दिनविशेषचा नियम सांगितला गेला आहे. तसे तर प्रत्येक मासाची पौर्णिमा आणि अमावास्या याला विशेष महत्त्व असते; परंतु माघाच्या पवित्र मासाची पौर्णिमा विशेष असते. प्रत्येक तीर्थात स्नान-दानासाठी ही तिथी परम फलदायिनी मानली गेली आहे. तीर्थराज प्रयागमध्ये माघी पौर्णिमेला स्नान, दान, गोदान आणि यज्ञ करणे, यांची परंपरा आहे. परमवैष्णव संत रविदास यांची जयंतीसुद्धा माघी पौर्णिमा या दिवशीच आहे.
२. कल्पवासाविषयीची अन्य माहिती
संगम क्षेत्रात निवास करणारे श्रद्धाळू कल्पवासी प्रातःकाळी संगम किंवा गंगा नदीत स्नानानंतर गंगामातेची आरती करतात. खरे पहाता श्रद्धाळूंना गंगा तटावर निवास करण्याची संधी मिळते, यासाठी ही गंगेप्रती एक प्रकारची कृतज्ञता अर्पण करणे आहे. गंगेची आरती केल्यानंतर श्रद्धाळू आपले तीर्थ-पुरोहितांचे शिबिर किंवा जेथे ते मासभर ‘कल्पवास’, हवन इत्यादी करतात. तेथे साधू-संन्यासी आणि सुहृदजन यांना भोजन देऊन स्वतःसुद्धा ग्रहण करतात. कल्पवासाच्या काळात ठेवलेल्या खाण्या-पिण्याच्या शेष वस्तू परत घरी घेऊन जाता येत नाहीत. त्या तेथेच दान केल्या जातात. असे म्हटले जाते की, येथे येऊन राजा हर्षवर्धननेही दान केल्याचे वर्णन आढळते. येथून घरी प्रसाद म्हणून घेऊन जाण्यासाठी गंगा नदीतील वाळू, गंगाजल, काही प्रसाद, कुंकू आणि हातात बांधायचा रक्षण करणारा दोरा इत्यादी असते.
३. माघी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणारे विधी आणि देण्यात येणारे दान
माघी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करण्याची सुद्धा परंपरा आहे. खरे पहाता असे केल्यावरही दान करण्याची परंपरा आहे. असे श्रद्धाळू माघी पौर्णिमेच्या दिवशी प्रातःकाळी स्नानानंतर भगवान विष्णूचे विधीवत् पूजन करतात. नंतर पितरांचे श्राद्ध करण्याचा नियम आहे. दीन दुबळ्यांना भोजन, वस्त्र आणि दान यांसह हा विधी पूर्ण होतो. अशी धार्मिक क्रिया करणारे श्रद्धावंत स्वतः दिवसभर व्रत करतात. सत्संग आणि कथा-कीर्तनात दिवसरात्र घालवून दुसर्या दिवशी व्रताचे पारायण करून अन्न ग्रहण करतात. माघी पौर्णिमा, म्हणजे व्रताच्या दिवशी अन्नधान्य, तीळ, कांबळे (घोंगडे), कापूस, गुळ, तूप, लाडू, फळे, वहाणा म्हणजे चप्पल इत्यादी आणि धन यांचे दान करण्यात येते.
४. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथा श्रवणाचे महत्त्व
प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथासुद्धा श्रवण केली जाते. प्रयागराजच्या संगम क्षेत्री माघ मासाच्या पौर्णिमेला जागोजागी शंख ध्वनीसह सत्यनारायण कथा गुंजत असते. बहुतेक वेळा कथा दिवसभराचे व्रत करून सायंकाळीच सांगितली जाते. सत्यनारायण व्रत कथा ही सत्यालाच नारायण मानून आपल्या सांसारिक व्यवहारात त्याला आत्मसात् करणार्यांची कथा आहे. जरी मोक्ष देण्याचा अधिकार केवळ विष्णूकडेच असल्याचे मानले जाते, तरी केवळ सत्यनिष्ठेच्या पायावरच मनुष्य रूप धारण करणारे श्रीरामसुद्धा जटायूला मोक्ष प्रदान करणारे बलशाली ठरले. तथापि प्रयागमध्ये स्नान, दान करून कथा श्रवण केली, तर त्यामुळे परम लक्ष्याची प्राप्ती होते, असे म्हणतात.’
– डॉ. प्रभात ओझा (साभार : मासिक ‘युगवार्ता’)
आज ‘माघस्नान समाप्ती’ आहे. त्या निमित्ताने…माघ मासाचे माहात्म्य आणि पर्व‘हिंदु पंचांगातील प्रत्येक मास ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा असतो. यामध्ये माघ मासाचे स्वतःचे एक वेगळे स्थान आहे, ज्याचा महिमा पुराणात आणि धर्मग्रंथांमध्ये भरपूर वर्णन केला आहे. हिंदु पंचांगात वसंत ऋतूला ‘ऋतुराज’ म्हटले गेले आहे. याच प्रकारे माघ मासाला ‘मासांचा महात्मा’, असे म्हटले गेले आहे. भारतीय वर्षातील १२ मासांपैकी ११ वा चंद्रमास आणि १० वा सौरमास याला ‘माघ’ असे संबोधित केले जाते. धार्मिक दृष्टीकोनातून माघ मासाचे सर्वाधिक महत्त्व आहे. साधू-संत आणि महात्माजन प्रयागराजच्या संगम तटावर कडाक्याच्या थंडीत ‘कल्पवास’ करण्यासाठी एकत्र येतात. कल्पवास शब्दाचा उपयोग पौराणिक ग्रंथांमध्ये केला गेला आहे. हा कल्पवास पौष शुक्ल एकादशीला आरंभ होऊन माघ शुक्ल द्वादशीपर्यंत चालतो. धार्मिक पर्वासाठी उपयुक्त मासअशी मान्यता आहे की, संगमाच्या थंडगार पाण्यात डुबकी मारल्यावर लोक पापमुक्त होऊन स्वर्गात जातात. ‘निर्णयसिंधु’मध्ये म्हटले गेले आहे की, माघ मासाच्या कालावधीत मनुष्याने निदान एकदा तरी पवित्र नदीत स्नान करायला पाहिजे. पवित्र नदीत एक दिवसाचे स्नान केल्यानेसुद्धा मनुष्य स्वर्गलोकाचा अधिकारी बनू शकतो. माघ मासाच्या अमावास्येला प्रयागराजमध्ये संगमात स्नान केल्यावर अनन्य पुण्य प्राप्त होते. माघ मासाच्या द्वादशीला व्रत करून ईश्वराची आराधना करण्यामुळे राजसूय यज्ञाच्या पुण्याची प्राप्ती होते. महाभारतातसुद्धा याचे वर्णन सापडते. माघ मासात जे साधूसंतांना तिळाचे दान करतात, त्यांना मृत्यूनंतर नरकात जावे लागत नाही. माघ मासात मंगळवारी व्रत करायला पाहिजे आणि त्या दिवशी मीठ खाऊ नये. या मासात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान अन् उबदार (लोकरीच्या) वस्त्रांचे दान करायला पाहिजे. माघ मास हा अध्यात्म मार्गासाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे सर्वाधिक धार्मिक पर्व याच मासात साजरे केले जातात. – श्री. मृत्युंजय दीक्षित (साभार : मासिक ‘युगवार्ता’) |