मैसुरू (कर्नाटक) येथे मुसलमानांकडून हिंसाचार

मुसलमानांच्या संदर्भात अवमानकारक पोस्ट प्रसारित झाल्याचे प्रकरण

मैसुरू (कर्नाटक) – येथे एका तरुणाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे अर्धनग्न अवस्थेतील एक छायाचित्र सामाजिक माध्यमांत पोस्ट केले. या छायाचित्रावर उर्दू भाषेत अवमानकारक लिखाण करण्यात आल्याचा दाव्यातून मुसलमानांनी येथे १० फेब्रुवारीच्या रात्री हिंसाचार केला. पोलिसांनी पोस्टच्या प्रकरणी सतीश नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

पोस्ट प्रसारित झाल्यानंतर मुसलमानांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. या वेळी पोलीस आणि मुसलमान यांच्यात वाद झाला. त्यानंतर मुसलमानांनी दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली. यानंतर हिंसाचार झाला. काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी हवेत गोळीबार करून दंगलखोरांना पांगवले. पोलिसांनी येथे जमावबंदी लागू केली आहे.

दंगलीमागे षड्यंत्र !

भाजपचे स्थानिक आमदार श्रीवत्स यांनी सांगितले की, या दंगलीच्या मागे कुणीतरी आहे; कारण पोस्ट करणार्‍या तरुणाला पकडून नेल्यानंतर सोडून देण्यात आले, अशी अफवा पसरवून कुणीतरी दंगल घडवली. एवढ्या अल्प कालावधीत २ सहस्र लोक जमतात कसे ? त्यामुळे यामागे कोण आहे हे शोधायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

संपादकीय भूमिका 

मुसलमानांच्या संदर्भात अवमानकारक काही घडले की, ते थेट कायदा हातात घेतात आणि निधर्मीवादी त्यांचा विरोध करत नाहीत !