१४ वर्षांच्या मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचे प्रकरण
बदलापूर – येथील एका खासगी शाळेत १४ वर्षांच्या मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला होता. या प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी अधिक चौकशी केली असती ही शाळा अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यामुळे शाळेतील दुसरी ते दहावीपर्यंतच्या वर्गांना टाळे ठोकण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संमतीने शहरातील एका मान्यताप्राप्त शाळेत त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या शाळेत शिशुवर्ग ते दहावी पर्यंत १६९ विद्यार्थी शिकत होते.
संपादकीय भूमिकाविनयभंगाच्या प्रकरणानंतर केलेल्या चौकशीतून शाळा अनधिकृत असल्याचे लक्षात आले ! शिक्षण विभागाला ते आधीच का समजले नाही ? अशा अनधिकृत शाळेला अनुमती देणार्यांवरही कारवाई व्हायला हवी ! |