एका डॉलरसाठी रुपयाचे मूल्य ८७ रुपये ९४ पैसे

डॉलरच्या तुलनेत रुपयांची पुन्हा घसरण !

नवी देहली – अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया ४४ पैशांनी घसरून ८८.९४ वर पोचला आहे. आतापर्यंतची ही ऐतिहासिक घसरण आहे. ‘भारतीय रुपया आशियातील सर्वांत खराब कामगिरी करणारे चलन बनले आहे’, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे.

१. एकीकडे रुपयाची घसरण चालू असतांना दुसरीकडे शेअर बाजारही गडगडला. १० फेब्रुवारीला सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६५० अंकांनी गडगडला आणि ७७ सहस्र २०० वर पोचला. ‘निफ्टी’ या राष्ट्रीय शेअर बाजाराचाही निर्देशांक २०० अंकांनी कोसळून २३ सहस्र ३५० वर पोचला आहे.

२. भारतीय चलन घसरण्यामागे पहिले कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी  स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम यांच्या आयातीवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा करणे आहे. यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून याचा दबाव रुपयावरही पडला. शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदार सातत्याने शेअर्सची (भागभांडवल यांची) विक्री करत असल्याचा फटकाही रुपयाला बसत आहे.