आंतरराज्य टोळीतील चोरटा अटकेत !

चोरीच्या पैशांतून प्रयागराज येथे गंगा नदीत स्नान केले !

नागपूर – येथील पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील चोरटा रजनीकांत केशव चानोरे (वय २४ वर्षे) याला अटक केली आहे. त्याने चोरीच्या पैशांतून प्रयागराज गाठले होते. तेथील गंगा नदीत स्नान करून तो नागपूरला परतला. त्याला मध्यप्रदेशमधील भोपाळ येथून अटक केली आहे. त्याने अनेक ठिकाणी चोर्‍या केल्या. त्याच्यावर पंधराहून अधिक गुन्हे नोंदवलेले आहेत. घरफोड्या करून मिळालेल्या पैशातून तो महागडे भ्रमणभाष, ब्रँडेड कपडे, चारचाकी बाळगायचा. त्याने नागपूर येथे आलिशान घरही भाड्याने घेतले होते. तो लग्नघरात चोरी करत असे. लग्नघरात चोरी करून तो चारचाकीतून पलायन करत असे.