मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

मुंबई – नवी मुंबई, मानखुर्द, मुंब्रा, दारूखाना, वाशीनाका, कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण येथे मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यात ९ महिला आणि ७ पुरुष यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्या बनावट कागदपत्रांवरून त्यांनी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानही केले. (असे केवळ भारतातच होऊ शकते ! – संपादक) अनेकांनी भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे सिद्ध केली आहेत. (यासाठी त्यांना साहाय्य करणार्‍यांवरही कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • बांगलादेशींचा वाढता सुळसुळाट म्हणजे राज्यासाठी डोकेदुखीच !
  • कित्येक वर्षे जुनी समस्या असलेल्या बांगलादेशी घुसखोरांवर पूर्वीच कारवाई झाली असती, तर ही वेळ आली नसती !