यवतमाळ येथील महिलेच्या विनयभंगप्रकरणी धर्मांधाला १६ वर्षांनी कारावास

अशाने महिलांच्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल का ? उशिरा मिळणारा न्याय हा अन्यायच नव्हे का ?

मुंबई – यवतमाळमधील आदिवासी महिलेचा आरोपी नौशाद याने ५ सप्टेंबर २००१ मध्ये विनयभंग करीत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर आरोपी नौशाद याला अमरावतीच्या अतिरिक्त सत्र न्यायधिशांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि त्याला जामीन दिला होता. त्यानंतर नौशाद याने शिक्षेमध्ये सौम्यता मिळण्यासाठी वर्ष २००६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर १६ वर्षांनंतर नुकतीच सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाने नौशादचा जामीन रहित करत कारावासाची शिक्षा सुनावली. (न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक ! – संपादक)

निकालाच्या वेळी न्यायमूर्ती देव यांनी आदेश देतांना म्हटले आहे की, तक्रारदार महिलेचा जबाब आणि प्रथमदर्शनी अहवाल यांमध्ये सुसंगती असून पुराव्यांची उलट तपासणी झाली आहे. त्यामुळे महिलेचा जबाब विश्‍वासार्ह आहे. विनयभंग हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत शिक्षेत सौम्यता दाखवण्याची आरोपीची मागणी मान्य करता येणार नाही. आरोपीला फक्त ६ मासांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावून सत्र न्यायालयाच्या न्यायधिशांनी खूपच दयाळूपणा दाखवला आहे. शिक्षेत घट केल्यास सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास न्यून होईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now