
भक्त म्हणतो, ‘भगवंता, तुला अशी वस्तू दिली पाहिजे की, जी तुझ्याजवळ नाही. तुझ्याजवळ काय नाही ? तू तर ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. लक्ष्मीपती आहे. तुझ्याजवळ नाही, असे काहीच नाही. तुला काय द्यायचे ? जे नाही, असे तुला काय द्यायचे ? तुझ्याजवळ केवळ एकच चीज (वस्तू) नाही. ते माझे मन तुझ्याजवळ नाही. तेच मी तुला देतो. भक्त, भगवंताला मन समर्पण करतो. नमन करून ‘न-मन’ होतो, ‘अ-मन’ होतो. भक्त निर्धास्त असतो. निश्चिंत असतो. शांत असतो; कारण प्रमाथी, बलवान, दृढ, हट्टी असे मनच त्याने भगवंताला दिले असते.
(साभार : मासिक : ‘घनगर्जित’, जानेवारी २०२४)