अश्‍लील चाळे करणार्‍या तरुणाचे चित्रीकरण करून पोलिसांना दिले !

मुंबई – नालासोपारा येथील एका तरुणीने अश्‍लील चाळे करणार्‍या तरुणाला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. २१ ऑक्टोबरला सकाळी कुटुंबियांसोबत मुंबईदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसला येण्यासाठी ती निघाली होती. त्या वेळी लोकलगाडीच्या महिलांच्या डब्यातून प्रवास करतांना डब्याला लागून असलेल्या जाळीतून एक तरुण तिच्याकडे पाहून अश्‍लील चाळे करत होता. मुलीने मोठ्या धाडसाने या तरुणाचे भ्रमणध्वनीवर चित्रीकरण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आल्यानंतर रेल्वे पोलिसांना त्याची माहिती दिली. मुलीने दिलेल्या चित्रीकरणाच्या साहाय्याने रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला कह्यात घेतले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now