‘एकदा गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) गच्चीत आले होते. त्या वेळी ‘ते जणू काही निसर्गाला भेटायला आले आहेत’, असे मला वाटत होते. त्या वेळी ‘निसर्गाला कसा आनंद झाला असेल ? त्याची भावस्थिती काय असेल ?’ असा विचार माझ्या मनात येताच मला काही ओळी सुचल्या आणि मलाही पुष्कळ आनंद झाला. तेव्हा ‘गुरुदेवांची प्रत्येक कृती आपल्याला भावस्थितीत घेऊन जाते आणि आपल्याला भरभरून आनंद देते’, असे माझ्या लक्षात आले.

पावसाची पडली देवाशी गाठ ।
पावसाने भिजवली देवाची पाठ ।। १ ।।
पाऊस झाला आतुर भेटीसाठी ।
देवाने द्वार उघडले त्याच्यासाठी ।। २ ।।

टपटप पडती थेंब मोठे, म्हणती कसे ? ।
‘देवा, तुम्ही आहात कुठे ?’ ।। ३ ।।
आकाशाच्या अंगणात इंद्रधनुष्याची (टीप १) रांगोळी ।
अवघी नभांगणा नगरी सजली ।। ४ ।।
लता, वृक्ष, पशू, पक्षी स्वागता सज्ज जाहले ।
ढगाच्या आडून देव-देवताही दाटीवाटीने उभे ठाकले ।। ५ ।।
सजीव निर्जीव घटकही सारे आनंदले ।
गुरुदर्शनाने कृतकृत्य झाले ।। ६ ।।
टीप १ – गुरुदेव येऊन गेल्यावर आकाशात इंद्रधनुष्य दिसले.
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (३.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |