Minor Rape Igatpuri School : अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक यांच्याकडून बलात्कार !

इगतपुरी (नाशिक) येथील घटना !

नाशिक – इगतपुरी येथे खासगी शाळेत शिकणार्‍या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीवर  मुख्याध्यापक तुकाराम साबळे (वय ५३ वर्षे) आणि वर्गशिक्षक गोरखनाथ जोशी यांनी बलात्कार केला. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. बलात्कार केल्यावर त्या दोघांनी मिळून तिला घरी सोडले.

संपादकीय भूमिका 

मुख्याध्यापक आणि शिक्षक हेच बलात्कार करू लागले, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कोण घडवणार ? शैक्षणिक क्षेत्र कलंकित करणार्‍या अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी  !