कुशीनगर (उत्तरप्रदेश) : सरकारी भूमीवर बेकायदेशीररित्या बांधलेल्या मदनी मशिदीवर बुलडोझर !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथील बेकायशीर मदनी मशीद बुलडोझरद्वारे पाडण्यात आली. ही मशीद सरकारी भूमीवर बांधण्यात आली होती. या संदर्भात तक्रार दाखल (प्रविष्ट) करण्यात आल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. यानंतर मशीद पक्षकारांनी ३ नोटिसांना उत्तर दिलेले नाही. यानंतर मुसलमान पक्षकारांनी उच्च न्यायालयाकडून ८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती मिळवून बुलडोझर कारवाई थांबवली होती; मात्र ९ फेब्रुवारी या दिवशी स्थगितीचा दिनांक संपल्यानंतर प्रशासनाने बुलडोझरद्वारे कारवाई करत ही मशीद पाडली.

हिंदु नेते राम बचन सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे याबद्दल तक्रार केली होती. तक्रार मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

ही मशीद पोलीस ठाणे आणि नगरपालिका यांच्या भूमीवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आली होती. (पोलीस ठाणे आणि नगरपालिका यांच्या भूमीवर मशीद बांधली जात असेपर्यंत पोलीस अन् प्रशासन झोपले होते का ? विशेष म्हणजे हिंदु नेत्यांनी तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली. जर तक्रार करण्यात आली नसती, तर पोलीस आणि प्रशासन अजूनही झोपून राहिले असते. यावरून राज्यात आणि देशातही अशी किती बेकायदेशीर बांधकामे अशा झोपाळूंमध्ये उभी आहेत, याचा आता शोध घेतला पाहिजे अन् कारवाई केली पाहिजे !- संपादक)

संपादकीय भूमिका 

मशीद बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?