Soldier Arrested For Spying : पाकसाठी हेरगिरी करणार्‍या भारतीय सैनिकाला अटक

१५ लाख रुपयांसाठी पुरवत होता गोपनीय माहिती

अटक करण्यात आलेला भारतीय सैन्यातील नाईक संदीप सिंह पोलिसांसमवेत

अमृतसर (पंजाब) – पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी (‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’साठी) हेरगिरी केल्याच्या प्रकरणी सध्या नाशिक येथील सैन्याच्या छावणीमध्ये तैनात असलेला भारतीय सैन्यातील नाईक संदीप सिंह याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले. या संचांद्वारे तो आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पाठवत होता. यासाठी त्याने १५ लाख रुपये घेतले होते.

पटियालामधील सार्दुलगड येथील रहिवासी असलेला संदीप सिंह वर्ष २०१५ मध्ये सैन्यात भरती झाला होता. गेल्या २ वर्षांत संदीप सिंह याने जम्मू, पंजाब आणि नाशिक येथील विविध सैनिकी छावण्यांची छायाचित्रे, तसेच शस्त्रे आणि अधिकारी यांची तैनाती यांविषयीची माहिती आय.एस्.आय.ला पाठवली होती.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !