‘आत्मशांती ही सौंदर्य, सांसारिक सुख, स्वर्ग, अष्टसिद्धी इत्यादींहूनही श्रेष्ठ आहे. आत्मशांती हा आपला स्वभाव आहे. मनात काम आला की, तुम्ही अशांत झालात. काम निघून गेला की, तुम्ही शांत झालात. मनाला क्रोध आला की, तुम्ही अशांत आणि क्रोध निघून गेला की, तुम्ही शांत झालात. मनात भय आले की, तुम्ही भयभीत झालात. भय निघून गेले की, तुम्ही शांत झालात. आत्मशांती ही जीवनाची मागणी आणि जीवात्म्याचे स्वाभाविक स्वरूप आहे. ज्याच्याकडे धन आहे; पण चित्तात शांती नाही, तो कंगाल आहे. ज्याच्याकडे सत्ता आहे; पण चित्तात शांती नाही, तर काय ‘खाक’ सत्ता आहे ! (साभार : मासिक ‘ऋषीप्रसाद’)