
कोल्हापूर, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत तानाजी मालुसरे समाधी (उमरठे) ते दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या दुर्ग रायगड (नरवीर मुरारबाजी देशपांडे समाधीमार्गे) येथे होत असलेल्या धारातीर्थ यात्रेसाठी (मोहीम) धारकरी कोल्हापूर येथून रवाना झाले. तत्पूर्वी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक आणि नित्यपूजा करून धारकर्यांनी प्रेरणा मंत्र अन् ध्येयमंत्र यांचे सामूहिक पठण केले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री तनय मोरे, रोहित अतिग्रे, आदित्य जासूद, आशिष पाटील, अवधूत चौगुले यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.
सांगलीतून पू. संभाजीराव भिडेगुरुजी मोहिमेसाठी रवाना !

मोहिमेसाठी सांगलीतून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी रवाना झाले. धारकर्यांना घेऊन मोहिमेसाठी रवाना होणार्या एका गाडीचे श्री गणपति मंदिरासमोर पूजन करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर यांसह धारकरी सर्वश्री मिलिंद तानवडे, अनिल तानवडे, राजू पुजारी यांसह अन्य उपस्थित होते.