
पुणे – एका अल्पवयीन हिंदु मुलीला लग्नाचे आमीष दाखवून आसिफ सलीम शेख फसवले. त्यानंतर ‘खासगीतील छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करेन’, अशी धमकी दिली. मुलगी अल्पवयीन असल्यापासून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. तिने सामाजिक प्रसारमाध्यमांवर ‘अनब्लॉक’ करावे; म्हणून तिच्या लहान भावाचे घरातून अपहरणही केले. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार पोलिसांनी असीफ सलीम शेख याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२२ पासून गुन्हा नोंद होईपर्यंत घडला आहे.
१. तक्रारदार ‘ब्युटी पार्लर’चे (सौंदर्य वर्धनालय) प्रशिक्षण घेत असतांना मैत्रिणीने तिच्या मावसभावाशी म्हणजे असिफशी सामाजिक प्रसारमाध्यमांवर ओळख करून दिली. (हा नियोजित ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे, असेच म्हणावे लागेल. पीडित हिंदु तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत असणार्या तिच्या मैत्रिणीवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)
२. तक्रारदार १६ वर्षांची असतांना आसिफ याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
३. वेळोवेळी लग्नाचे आमीष दाखवून आणि छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन अत्याचार केले.
४. ३ फेब्रुवारी या दिवशी तक्रारदाराच्या ७ वर्षाच्या भावाचे बळजोरीने अपहरण केले. तक्रारदाराने भावाला असिफकडून सोडवून घेतले आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. (अशा गुन्हेगारी वृत्तीच्या धर्मांधांना शरियत कायद्यानुसार शिक्षा होणे अपेक्षित आहे ! – संपादक)