‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजना
मुंबई – केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ ही अभिनव योजना आखत प्रतिमाह ३०० युनिटपर्यंत विनामूल्य वीज देण्याचे प्रावधान केले आहे. याच योजेनच्या कार्यवाहीचे उद्दिष्ट म्हणून सध्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात ‘सामंजस्य करार’ करण्यात आला.
टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड ही टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची उपकंपनी आहे. तिने प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या अंतर्गत निवासी छतावरील सौर प्रकल्पांसाठी परवडणारे वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ बडोदासमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य कराराद्वारे, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा यांनी छतावरील सौर प्रतिष्ठापन सुलभ, परवडणारे पर्याय देतील.