Minor Hindu Girl Murdered : बांगलादेशातील मौलवी बाजारात अल्पवयीन हिंदु मुलीची निर्घृण हत्या

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील मौलवी बाजारातील कमलगंज उपजिल्हा येथे एका हिंदु मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत मुलीचे नाव पूर्णिमा रेली असे आहे. ती चौथीची विद्यार्थिनी होती.

५ फेब्रुवारीपासून ही मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. शेवटच्या वेळी ती जनावरांना चरण्यासाठी शेतात घेऊन जातांना दिसली होती. तिच्या बेपत्ता झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ६ फेब्रुवारीला तिचा मृतदेह शमशेरनगर चहाच्या बागेत कामगारांना आढळला. मुलीची मान आणि मनगट कापले गेले होते.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती !