Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे चालू आहे जनजातीय बांधवांचा मेळावा !

जनजातीय मेळाव्याअंतर्गत आयोजित शोभा यात्रा

प्रयागराज – वनवासी कल्याण आश्रम यांनी ६ ते १० फेब्रुवारी या कालावधीत भव्य जनजातीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात देशभरातील अनुमाने २५ सहस्र जनजातीय बांधव त्यांचा संस्कृती आणि परंपरा जपण्याची, तसेच वृद्धिगंत करण्याची प्रतिज्ञा घेत आहेत. काही वर्षांपासून वनवासी कल्याण आश्रम देशभरातील विविध कुंभ उत्सवांमध्ये जनजातीय समाजाचा समावेश करण्यासाठी, तसेच त्यांच्या सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

जनजातीय नृत्य कार्यक्रम

युवा कुंभ ६ आणि ७ फेब्रुवारी, शोभा यात्रा ७ फेब्रुवारी, जनजातीय संगीत आणि नृत्य ७, ८ आणि ९ फेब्रुवारी आणि संत संमेलन १० फेब्रुवारी या दिवशी होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे सलील नेमाणी यांनी दिली आहे.