प्रयागराज, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – ८ फेब्रुवारीला त्रिवेणी संगम आणि सर्व घाट यांवर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक प्रशासनाने कुंभक्षेत्रात येणारी वाहने रोखली आहेत. केवळ पासधारक वाहनांनाच कुंभक्षेत्रात सोडण्यात येत आहे.
७ फेब्रुवारीच्या रात्री उशिरापर्यंत वाहनांना कुंभक्षेत्रात सोडण्यात येत होते. रात्रीपासून कुंभक्षेत्रात रेल्वेस्थानकावरून पायी येणारे भाविक आणि खासगी वाहनांद्वारे कुंभक्षेत्रात येणारे भाविक यांची गर्दी प्रचंड वाढली. त्यामुळे रात्री उशिरापासून कुंभक्षेत्रात वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.