Devil’s Trouble in Dakshina Kannada : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मालाडी येथे भूतबाधेच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चर्चा

भ्रमणभाषद्वारे कथित भूताचे काढण्यात आलेले छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित

दक्षिण कन्नड (कर्नाटक) – येथील मालाडी भागातील एका घरात भूताची बाधा असल्यामुळे एक कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे, असे वृत्त ‘एशियानेट न्यूज’ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे. या घरात भांडी फेकली जातात, कपड्यांना अचानक आग लागते आणि गळा दाबण्यासारख्या घटना घडत असल्याचा दावा केला जात आहे. भ्रमणभाषमधील कॅमेर्‍याद्वारे एका आकृतीचे छायाचित्र काढण्यात आले असून ते भूत असल्याचा दावा केला जात आहे. हे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या घटनेने मालाडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमेश शेट्टी त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्यासमवेत या घरात रहात आहेत. मागील ३ मासांपासून त्यांना या अज्ञात शक्तींचा सामना करावा लागत आहे. ‘कुणीतरी वाहनात आणलेला प्रसाद घरात आल्यापासूनच या समस्या चालू झाल्या आहेत’, असा दावा या कुटुंबाने केला. मंत्र-तंत्र तज्ञ आणि ज्योतिषी यांनी या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव असल्याचे म्हटले आहे.