Milkipur By-Election Result : अयोध्येतील मिल्कीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्‍चित !

भाजपचे उमेदवार चंद्रभानू पासवान

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी चालू असून येथे भाजपचे उमेदवार चंद्रभानू पासवान आघाडीवर आहेत. ३० पैकी २० फेर्‍यांच्या झालेल्या मतमोजणीत भाजप ५० सहस्र मतांनी आघाडीवर आहे.

येथील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा जागेवर भाजपचा समाजवादी पक्षाकडून ७ सहस्र मतांनी पराभव झाला होता. अवधेश प्रसाद येथे आमदार होते. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवून जिंकल्याने ही जागा रिकामी झाली होती.